👌👌👌 धसई विभाग विकास मंडळ धसई संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेचा NMMS परीक्षेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो . या शाळेतून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी NMMS परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांना वर्षाला 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मदत होत आहे .
यावर्षी NMMS परीक्षेची प्रश्नपत्रिका कठीण होती म्हणून बरेच विद्यार्थी नापास झाले आहेत अनेक शाळांचा निकाल कमी लागला आहे . अशाही परिस्थितीमध्ये स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेतून 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 7 विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत . या विद्यार्थ्यांना वर्षाला 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी व पालक यांना याचा फायदा होणार आहे .
.jpeg)

.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)
No comments:
Post a Comment