Sunday, April 6, 2025

NMMS परीक्षेत स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसईचे 9 विद्यार्थी उत्तीर्ण

👌👌👌                   धसई विभाग विकास मंडळ धसई संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेचा NMMS परीक्षेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो . या शाळेतून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी NMMS परीक्षा उत्तीर्ण झाले असून त्यांना वर्षाला  12 हजार रुपये शिष्यवृत्ती  मिळाली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमुळे अनेक पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी मदत होत आहे .

                              यावर्षी NMMS परीक्षेची प्रश्नपत्रिका कठीण होती म्हणून बरेच विद्यार्थी नापास झाले आहेत अनेक शाळांचा निकाल कमी लागला आहे .   अशाही परिस्थितीमध्ये   स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेतून 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 7 विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत . या विद्यार्थ्यांना  वर्षाला  12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थी  व पालक यांना याचा  फायदा होणार आहे .



 












डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत कु. साई धनाजी फर्डे याला ब्रांझ मेडल

धसई विभाग विकास मंडळ संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई येथील कु. साई धनाजी फर्डे हा विद्यार्थी -   DO. HOMI BHABHA बालवैज्ञानिक स्पर्धेत उत्तीर्ण होऊन 1 ल्या प्रात्यक्षिक परीक्षेतही  उत्तीर्ण झाला म्हणून  संस्थेने त्याला ब्रांझ मेडल व प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान- सत्कार केला . संपूर्ण तालुक्यातून साई हा एकमेव विद्यार्थी प्रक्टिकल परीक्षा पास झाला त्यामुळे शाळेला व संस्थेला त्याचा  खूप अभिमान वाटत आहे . कु. साई धनाजी फर्डे याचे मन:पूर्वक अभिनंदन ! व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
 


NMMS परीक्षेत स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसईचे 9 विद्यार्थी उत्तीर्ण

👌👌👌                   धसई विभाग विकास मंडळ धसई संचलित स्वा. सै. किसनबाबा विद्यामंदिर धसई शाळेचा NMMS परीक्षेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो...